भुसावळात ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी
नाहाटा महाविद्यालयाजवळ अपघात : तरुणीच्या उजव्या पायावरून गेला ट्रक
भुसावळ : नाहाटा महाविद्यालयाकडून घराकडे निघालेल्या महाविद्यालयीन तरुणीच्या पायावरून भरधाव ट्रकचे चाक गेल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाच्या वळणावर घडली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला तर अपघातामुळे काही वेळ या भागात वाहतूक ठप्प झाली. या अपघातात विद्यार्थिनी नेहा शिवनाथ विश्वकर्मा (19, हनुमान नगर, भुसावळ) ही महाविद्यालयीन तरुणी जखमी झाली. जामनेर रोडवरून भरधाव ट्रक वळसा घेत असताना हा अपघात झाल्याचे समजते.
नगरसेवक पिंटू कोठारींनी दाखवली तत्परता
अपघाताची माहिती कळताच नगरसेवक व साईसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थिनी नेहा विश्वकर्मा हिला दीपक नेमाडे, अग्रवाल व राजीव निंबाळकर यांच्या मदतीने तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. दरम्यान, अपघात प्रकरणी बाजारपेठ पोसिलात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.



