कामायनी व काशी एक्स्प्रेसला नेपानगर रेल्वे स्थानकावर थांबा
भुसावळ : नेपानगर रेल्वे स्थानकावर कामायनी व काशी एक्सप्रेसला 19 मार्चपासून थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 15018/15017 गोरखपूर-लोकमान टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस अणि गाडी क्रमांक 11072/11071 वाराणसी-लोकमान टिळक टर्मिनस-वाराणसी एक्सप्रेस या गाडी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी नेपानगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


