भीषण अपघातात 14 मेंढ्यांचा मृत्यू
औरंगाबाद : भरधाव ट्रकच्या धडकेत 14 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मेंढ्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात घडल्यानंतर मेंढपाळ शेतकर्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
रस्ता ओलांडताना ट्रकने दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वीर हे शेतकरी औरंगाबाद सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्यावर आपल्या 22 मेंढ्या घेऊन रस्ता ओलांडत होते. याचवेळी एक विटाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत होता. ट्रकचा वेग जास्त असल्याने शेतकर्याने त्याला हात करून वेग कमी करण्याचा इशाराही केला. मात्र, ट्रकच्या ड्रायव्हरला नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्याने ट्रक थेट मेंढ्यांच्या कळपावर घातला. ज्यात 22 पैकी 14 मेंढ्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

