द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करा : शिशिर जावळे
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
भुसावळ : 1990 साली कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची दखल घेवून डायरेक्टर विनोद अग्निहोत्री यांनी बनवलेला द कश्मीर फाइल्स हा चित्रपट नुकताच देशभरात ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी नमो विचार मंचचे संस्थापक तथा भाजपा भुसावळचे शिशिर जावळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
वास्तविकता दर्शवणारा चित्रपट
सन 1990 च्या दशकामध्ये काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांच्यावर अमानवी झालेल्या अन्याय अत्याचाराबद्दल तसेच त्या काळातील आतंकवाद आणि सध्या सुरू असलेल्या आतंकवादाची भयानक स्थितीचं वर्णन , अत्याचाराची भयावह भीषण स्थिती वास्तविकता द कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. हा चित्रपट देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव व शहर या ठिकाणी दाखवण्याची सक्ती करावी तसेच चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी शिशिर जावळे यांनी केली आहे.


