भुसावळातील महामार्गावरील ढाब्यावर छापा : 15 हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त


भुसावळ : भुसावळ शहर व तालुका हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर छापा टाकून कारवाई करण्यासाठी महामार्गावरील अवैधरीत्या होणारी मद्यविक्री रोखण्याबाबत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी शहरातील तीनही पोलिस ठाण्यांना आदेश काढले होते. या अनुषंगाने उपअधीक्षकांच्या पथकाने पिंपरीसेकम शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक सहा लगत असलेल्या फौजी धाब्यावर छापा टाकून देशी- विदेशी मद्याच्या सुमारे 15 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी हॉटेल चालक संदीप ज्ञानेश्वर भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने अवैधरीत्या मद्य विक्री करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण (रीडर), सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शांताराम चौधरी, पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सोनवणे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल शालिनी वलके, अश्विनी जोगी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !