शेतमजुराचा डोक्यात दगड टाकून खून : या शहरातील घटना
सटााणा : डोक्यात दगड घालून शेत मजूराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (40, रा. पिंगळवाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंधाणा फाट्याजवळील हॉटेल गुरुप्रसादच्या पाठीमागे मोकळ्या जागेत माळी याचा मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सटाणा पोलिसात खुनाचा गुन्हा
सटाणा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेनगर शिवारातील शेतकरी सुदर्शन सोनवणे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून माळी काम करीत होता. तो बाजार करण्यासाठी घराबाहेर गेला. पण, रात्री घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर हा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार हेमंत कदम, प्रकाश शिंदे, भास्कर बस्ते, अजय महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

