34 वर्षीय तरुणाची आत्महत्या


नाशिकरोड : नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत पंकज अशोक कदम (34, धनगर गल्ली, देवळाली गाव) या युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या दरम्यान घडली. पंकजने गळफास घेतल्याचे लक्षात आल्याने त्यास पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सुंदरनगर पोलीस चौकीतील पोलीस नाईक लखन हे पुढील तपास करीत आहेत.

डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू
नाशिकरोड : पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल विकास रामचंद्र पवार (54, रा.गजानन स्पर्श अपार्टमेंट, पिंटो कॉलनी, जेलरोड) या नागरीकाचा डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली. उपचारा दरम्यान डॉ. दिग्विजय पाटील यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !