यावलमध्ये डेंग्यूच्या नायनाटासाठी प्रतिबंध करा : डॉ.कुंदन फेगडे
यावल : शहरात सध्या डासांचा प्रादूर्भाव वाढला असून डासांमुळे मलेरीया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ.कुंदन फेगडे यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, पालिकेने कंटेनर सर्वे करावा, घरात कूलर, टायर, डबे, बादल्या, निरुपयोगी भांड्यांमध्ये पाणी साचत असेल तर ते खाली करावे, जेणेकरून एडिस इजिप्ती नावाच्या डासांची उत्पत्ती बंद होईल आणि डेंग्यू आणि चिकुनगुन्या सारखे आजार पसरणार नाहीत, शहरात साचलेले दीर्घकालीन डबके तपासून त्यात डास मारण्याचे औषध सोडावे तसेच गटारींवर फवारणी करावी आदी उपायययोजना करण्याची मागणी डॉ.कुंदन फेगडे यांनी केली आहे.
