शेतातील ठिबक नळ्यांना आग लावत पाईपांचे नुकसान


जळगाव : तालुक्यातील लमांजन येथील शेतकर्‍याच्या शेतातील ठिंबक नळ्या आणि पाईपाचे नुकसान करण्यात आले.

अज्ञातांनी केले नुकसान
जळगाव तालुक्यातील लमांजन येथील रहिवासी पुंडलिक दामू खामकर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील लमांजन शिवारातील गट नं. 150/3 आणि 166 मध्ये शेत आहे. शेतात पीक काढण्यात आल्यानंतर त्यांनी शेतातील ठिंबकच्या नळ्या शेतातच्या बांधावर गोळा करून ठेवलेल्या होत्या. गुरूवार, 14 एप्रिल रोजी सांयकाळी पाच वाजता शेतातील काम आटोपून पुंडलिक खामकर हे घरी आले.


मध्यरात्री लावली आग
मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील बांधावर ठेवलेले ठिंबक नळ्या पेटवून दिल्या आणि शेतातील पाईप व अन्य साहित्यांची तोडफोड करण्यात आली. शुक्रवार, 15 एप्रिल रोजी सकाळी पुंडलिक खामकर हे शेतात गेले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !