भुसावळात आज ‘चेतना के स्वर’ राष्ट्रीय समूहगान स्पर्धा
भुसावळ : भारत विकास परीषद, देवगिरी प्रांततर्फे शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविवारी दुपारी 12.30 वाजता ‘चेतना के स्वर’ राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून क्षेत्रीय सचिव सचिन गांजवे (संस्कार), नाहाटा महाद्यिालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, क्षेत्रीय सचिव श्रीपाद टाकळकर (संस्कार) असतील तर बक्षीस वितरण कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी.पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष तुषार तोतला, सचिव योगेश मांडे, कोषाध्यक्ष अरुण जोशी, संयोजक रमाकांत भालेराव व उज्वल चौधरी यांनी केले आहे.
