सण-उत्सव एकोप्याने साजरे करा : पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे
रावेर : आगामी रमजान ईद व अक्षयतृतीया सण नागरीकांनी एकोप्याने साजरे करावेत, उपद्रवी लोकांपासून सावध रहावे व तेढ निर्माण करणार्या पोस्ट कुणी सोशल मिडीयात टाकल्यास पोलिस प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही शिवाय अशांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी केले. रोजे ईप्तार पार्टीत ते बोलत होते.
नागझिरी परीसरात आयोजन
रावेर पोलिस स्टेशनतर्फे सर्वधर्म समभाव ईप्तार पार्टी नागझिरी परीसरात आयोजित करण्यात आली. व्यासपीठावर मौलाना गयासुद्दीन, ऋषिकेश महाराज, मौलाना नजर, मौलाना शकिल, कपिल महाजन, पोलिस निरीक्षक कैलास नागरेंसह सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगरसेवक आसीफ मेंबर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, काँग्रेस उपाध्यक्ष संतोष पाटील, गयास शेख, युसूफ खान, बाळु शिरतुरे, अॅड.योगेश गजरे, पंकज वाघ, भावलाल महाजन, असदउल्ला खान, दिलीप पाटील, शब्बीर सर, सावन मेढे, धुमा तायडे, गयासुद्दीन काझी, शेख सादीक, शेख रफीक आदी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.