गरजू विद्यार्थ्यांना शिंदी गावात शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिंदी गावात राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन


भुसावळ : राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची 195 वी जयंती तसेच विश्वरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्त अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम अंतर्गत गोरगरीब, होतकरु, गरजू 20 विद्यार्थ्यांना शिंदी येथील श्रीकृष्ण शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच पोक्सो कायद्याविषयी माहिती देण्यात आली.

या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
यावेळी शिंदी सरपंच नीता किरण जाधव, मुख्याध्यापिका प्रतिमा पाटील, उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी, पोलिस पाटील अतुल पाटील, श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी शाळेचे संचालक तथा वरीष्ठ लिपिक भगवान पाटील, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर, शिंदी हायस्कूलचे शिक्षक भास्कर वारके, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश जावळे आदींची उपस्थिती होती. अ‍ॅड.रमेश पांडव यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी केले.


यांची कार्यक्रमास हजेरी
श्रीकृष्ण हायस्कूलचे उपशिक्षक नारायण पाटील, शांताराम कोळी, राकेश ठाकरे, गोकुळसिंग राजपूत, निलेश फालक, राजेंद्र महाजन, महेश महाजन, रेखा नेमाडे, अर्चना उमराणे, कनिष्ठ लिपिक दिगंबर कोल्हे, वरीष्ठ लिपिक भगवान पाटील, आरोग्य सेविका आशा साळुंखे,
आरोग्य सेवक बालाजी कोरडे, आशा सेविका लक्ष्मी कोल्हे, शालेय पोषण आहार मदतनीस लता पाटील, स्वयंपाकी सुलोचना कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळसिंग राजपूत तर आभार जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिंदीचे उपशिक्षक तथा आदर्श शिक्षक समाधान जाधव यांनी मानले. फाउंडेशन उपाध्यक्ष द्रोपदाबाई बाविस्कर, सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सदस्य सुजाता सपकाळे यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !