भुसावळात रमजान ईदनिमित्त विश्व शांतीसाठी प्रार्थना


भुसावळ : विश्वात शांतता नांदावी, हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकून रहावे या आशयाची प्रार्थना भुसावळातील मुस्लीम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खडका रोडवरील ईदगाह मैदानावर बुधवारी सकाळी अदा केली. तब्बल दोन वर्षानंतर मुस्लीम बांधवांची ईदची नमाज अदा केली. सकाळी 8.30 वाजता सामूहिक नमाज पठण सुरू झाले तर नऊ वाजेपर्यत नमाज अदा करण्यात आली. खडका रोडवरील ईदगाह मैदानावर मौलाना रेहान शेख यांनी तर जामनेर रोडवरील जुन्या ईदगाव मैदान येथे मौलाना सुखियान रजा यांनी नमाज पठण केले.

पोलिसांनी दिल्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा
ईदगाह मैदानातून बाहेर आलेल्या मुस्लीम बांधवांना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक हरीष भोई आदींनी गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.



कुर्‍हेपानाचेत जुगारींच्या अटकेला सरपंचांसह चौघांचा विरोध ; पोलिसांनी दाखवला कारवाईचा ‘एक्का’


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !