मुक्ताईनगरात रमजान ईद उत्साहात साजरी

राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश


मुक्ताईनगर : शहरात मंगळवारी ईद-उल-फितरची नमाज पठण करण्यात आली. सकाळी आठ वाजता मुफ्ती अकील यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण करण्यात आली. सकाळपासुन ईदगाह मैदानात ईदच्या नमाजसाठी मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी झाली होती. अल्लाह संपूर्ण विश्वात शांती नांदू दे, सर्व समाजाला एकोप्याने ठेव, अशा आशयाची प्रार्थना मुफ्ती अकील यांनी केली.

ईदगाह मैदानाबाहेर सामाजिक सलोख्याचे दर्शन
प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, प्रवीण चौधरी, डॉ.जगदीश पाटील, मणियार बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, गोपाल सोनवणे, नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक निलेश शिरसाट, प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार गणेश मनुरे,
नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक शेख शकील, आरीफ आझाद, नूर मोहम्मद, शकुर जमादार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, मजीद बेपारी,
दिलीप पाटील, मुख्तार खान, नगरसेवक संतोष मराठे, शकील मेंबर आदी समाजबांधव उपस्थित होते.



भुसावळात रमजान ईदनिमित्त विश्व शांतीसाठी प्रार्थना

 

‘सर्वोच्च’ अल्टीमेटम : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !