शकील शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान


भुसावळ : आदिल शाह फारूकी बहुउद्देशीयय संस्थेतर्फे मंगळवारी राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण जळगाव येथील अल्पबचत भवनात करण्यात आले होते. या कार्यक्रमात दैनिक स्वतंत्र भारतचे रावेर तालुका प्रतिनिधी शकील शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्वला मछिंद्र पाटील होत्या. दीपप्रज्वलन हकीम आर.चौधरी व फारूक शेख, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी तर सूत्रसंचालन अली अंजुम रीजवी, जळगाव यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश बोरसे यांनी केले. यावेळी किमान 38 मान्यवरांनादेखील पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. यावेळी हकीम चौधरी, गनी मेमन, फारूक शेख, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जावेद शेख याकूब, अय्यूब शेख, शेख अल्ताफ, जावेद शाह, जुबेर शाह आदींनी परीश्रम घेतले. संस्थाध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !