भुसावळात भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा : महिलांच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष


भुसावळ : शहरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी शहरातील अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांचे लेझीम पथकाने लक्ष वेधले. मंगळवारी सायंकाळी अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. तत्पूर्वी, भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शोभायात्रा सुरू झाली. त्यात लेझीम पथक, ढोल, ताशे, पालखी आणि ट्रॅक्टरवर भगवान परशुराम यांची मूर्ती ठेवली होती. ही शोभायात्रा समितीचे अध्यक्ष नमा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. जामनेर रोडवरून म्युनिसीपल पार्कमधील श्रीराम मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला.

‘सर्वोच्च’ अल्टीमेटम : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा) शर्मा, पं.रवीओम शर्मा, प्रशांत वैष्णव, जय प्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, भूषण वैद्य, ए.के.तिवारी, सागर पत्की, देवेश कुलकर्णी, गौरव हिंगवे, गोकुळ दुबे, आशिष तिवारी आदींनी परीश्रम घेतले.



बंद घर फोडून रोकडसह एक लाखांचे दागिने चोरीला : पारोळ्यातील घटना


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !