भुसावळातील पाणीपुरवठा सुरळीत : लिकेजची पालिकेकडून दुरुस्ती
भुसावळ : रेल्वे कॉलनी परीसरातील पालिकेच्या मेन रायझिंगला भगदाड पडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मात्र पालिकेने तातडीने यंत्रणा कार्यरत करीत बुधवारी रात्री उशिरापर्यंत लिकेजची दुरुस्ती केल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे मात्र रोटेशन एका दिवसाने पुढे ढकलले गेले आहे.
अवघ्या 130 रुपयांसाठी त्याने घेतले ऐनपूरात युवकाचे प्राण
जीर्ण पाईप लाईनची डोकेदुखी
शहराला होणार्या पाणीपुरवठ्याची पाईप लाईन अत्यंत जीर्ण झाल्याने वारंवार ती लिकेज होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परीणाम होतो व त्यास पर्याय म्हणून अमृत योजना शहरासाठी मंजूर आहे मात्र या योजनेचेही काम संथगतीने सुरू असल्याने शहरवासीयांना मनस्ताप सोसावा लागत आहे. दरम्यान, 500 मी.मी. व्यासाच्या पाईप लाईनीला मंगळवारी भगदाड पडल्याने हजारे लीटर पाणी वाहून गेले परीणाम शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेने बुधवारी फुटलेल्या पाईप लाईनीला वेल्डींगच्या साह्याने जोडल्यानंतर त्यावर सिमेंटने बांधकाम केले व बांधकाम वाळल्यावर रात्री बारानंतर जोडलेल्या पाईप लाईनीची चाचणी घेण्यात आली. गुरूवारपासून सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख म्हणाले.

