यावलमधील तरुणावर हल्ला : तिघांविरोधात गुन्हा

यावल शहरातील धक्कादायक घटना : चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी : तिघा संशयीतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा


यावल : एकाच महिलेशी दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून शहरातील देशपांडे गल्लीतील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय तरुणावर शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जावेद युनूस पटेल (22, देशपांडे गल्ली, यावल) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या फिर्यादीवरून फैजपूरातील तिघा संशयीतांविरोधात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

अडचणी कायम : राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांना २० मे पर्यंत कोठडी

प्रेमसंंबंधातून तरुणावर चाकू हल्ला
जावेद पटेल या तरुणाचे शहरातील एका भागातील महिलेशी प्रेमसंबंध आहेत तर संशयीत आरोपी मुज्जू याचेदेखील त्याच महिलेशी संबंध आहेत व त्याच वादातून शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता मुज्जूसह अन्य दोघांनी जावेद यास दुचाकीवरून भुसावळ रस्त्यावर असलेल्या घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ नेले व तेथे त्यांच्यात महिलेवरून पुन्हा वाद झाला. संशयीत मुज्जू याने हातावर, मांडीवर, पाठीवर चाकूचे सपासप वार केले तर अन्य दोन अनोळखी संशयीतांनी चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केली.

फैजपूरातील तिघा संशयीतांविरोधात गुन्हा
वाहनधारक हा प्रकार पाहत असतानाच संशयीतांनी धूम ठोकली तर जखमी अवस्थेतील जावेद पटेल याने नातेवाईकांना माहिती दिली व त्याला तातडीने रात्रीच ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. गंभीर जखमी जावेद पटेल याचा यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशीत कांबळे व पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांनी जवाब नोंदवल्यानंतर मुज्जूसह अन्य दोघा अनोळखींविरोधात (तिघे रा.फैजपूर, ता.यावल) यावल पोलिसात भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

उधारीच्या वादातून ऐनपूरला युवकाचा खून : आरोपीला धामोडीच्या जंगलातून अटक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !