पुण्यातील सातव्या अ.भा.मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनासाठी जिल्ह्यातून चित्रकार कवी दिनेश चव्हाण मुख्य निमंत्रीत


चाळीसगाव :  सातवे अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्यसंमेलन पुण्यात आचार्य अत्रे रंगमंदिर (ए.सी.) शनिवार व रविवार शनिवार, 14 व रविवार, 15 मे रोजी होत आहे. या महाकाव्य संमेलनास जिल्ह्यातून चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांची एकमात्र नियुक्ती झाली आहे. या संमेलनात ते एक सत्रात सूत्रसंचलन करतील व दुसर्‍या सत्रात मुख्य निमंत्रित कविमध्ये आपली रचना सादर करतील.

चर्चा तर होणारच ! मुक्ताईनगरात चोरी झाली 70 हजारांची आवई उठली मात्र 30 लाखांची

यांची राहणार उपस्थिती
संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर असतील. उद्घाटन सोलापूरचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्याहस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून सह्याद्री युथ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा गोरक्षक शंभू पवार असतील. समारोपासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले यांची उपस्थिती असेल. या संमेलनात दिनेश चव्हाण आपल्या कलेचे काही प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.

हल्ला केल्या प्रकरणातील पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !