कर्मचार्‍यांच्या अप-डाऊनमुळे रावेरात रुग्णांची हेळसांड


रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अप-डाऊनमुळे रुग्णांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

रुग्णांची होतेय गैरसोय
रावेर तालुक्यातील अत्यावश्यक सेवा म्हणून रावेर ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. येथे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात तालुकाभरातून रुग्ण येतात.परंतु सध्या ग्रामीण रुग्णालयाला अप-डाऊनचे ग्रहण लागले आहे. काही परीचारीकांसह इतर कर्मचारी, शिपाई सोयीच्या ठिकाणावरुन अप-डाऊन करतात. हॉस्पीटल प्रशासनाने आखुन दिलेल्या वेळेची चांगली पायमल्ली होताना दिसून येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांची बदली झाल्यानंतर रुग्णालयाची शिस्त कमालीची बिघडल्याचा आरोप होताना दिसून येतो. रावेरातील वैद्यकीय अधिकार्‍यांची मदार सद्या प्रभारीराजवर अवलंबून आहे. कारभार पुन्हा सुरळीत करण्यासाठी येथे पुन्हा डॉ.एन.डी.महाजन यांना पुन्हा पाठवण्याची मागणी रुग्णांमधून जोर धरताना दिसून येते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !