भुसावळात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : शहरात क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याच्या नियोजित जागेवर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी महाराणा प्रताप यांच्या लहान पुतळ्याचे पूजन केले. याप्रसंगी पुतळ्याचा परीसर रांगोळी काढून सुशोभीक करण्यात आला. आमदार संजय सावकारे यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगरसेवक युवराज लोणारी, परीक्षीत बर्हाटे, दामोदर राजपूत, चंदूसिंग चव्हाण, रणजीतसिंग राजपूत, आनंदा पाटील, विक्रांत सिंह कुशवाह, विकी राजपूत, दलजीत चौधरी, किरण पाटील, सोनू राजपूत, शैलेश पाटील, संजीव पाटील, सोनी ठाकूर, अनुप ठाकूर, गोपी राजपूत, संदीप राणा, बबलुसिंग, विजय राजपूत, सुमित राजपूत, भागवत राजपूत, अनिल पाटील, पंकज राजपूत, अनिता आंबेकर, श्याम गोविंदा, व इतर समाज बांधव उपस्थित होते.