फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार
भुसावळ : तालुक्यातील साकेगावातील रहिवासी व हल्ली सुरतस्थित हर्षल अण्णा पाटील यांनी धनी पर्सनल लोण फायनान्स कंपनीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
लोण न घेताच वसुलीसाठी तगादा
हर्षल यांच्या तक्रारीनुसार, जळगावातील धनी पर्सनल लोण फायनान्स कंपनीने त्यांच्या नावाने लोण दिले असून प्रत्यक्षात त्यांनी लोणसाठी कुठलाही अर्ज वा कागदपत्रे दिलेली नाहीत. संबंधीत लोण कंपनीने कर्ज वसुलीसाठी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना धक्काच बसला. मुळात प्रत्यक्षात कर्ज घेतले नसताना लोण अॅप्रुव्ह झाले कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. आपल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून काही अप्रिय घटना घडल्यास त्यास संबंधित जवाबदार असतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.