शौचालय भ्रष्टाचार प्रकरण : बँकांना याद्याबाबत पोलिसांनी दिले पत्र


रावेर : शौचालय भ्रष्टाचारप्रकरणी तपास कामी रावेर पंचायत समितीकडून अनुदान वर्ग केलेल्या लाभार्थीचा प्रस्ताव मागणीसाठी पोलिस प्रशासनाने पत्र दिले आहे तसेच रावेर शहराबाहेर असलेल्या काही बँक शाखांकडील याद्या येणे बाकी आहे. आरोपी ताब्यात मिळाल्यावर या गुन्ह्यातील दोषींवर अटकसत्र सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बँकांकडे मागितल्या लाभार्थींच्या याद्या
रावेर पंचायत समिती झालेल्या शौचालय भ्रष्ट्राचाराचा तपास सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शौचालय भ्रष्ट्राचार योजनेच्या तपासकामी रावेर शहरात असलेले सर्व बँकांनी लाभार्थींच्या याद्या आम्हाला दिल्या आहेत मात्र रावेर शहराबाहेर असलेल्या एसबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक शाखा, सेंट्रल बँक शाखा, युनियन बँक शाखा आदींकडून निधी वर्ग झालेल्या लाभार्थींची यादी येणे बाकी आहे. शौचालय योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थींचे प्रस्तावदेखील मागविले आहे परंतु अद्याप आम्हाला पंचायत समितीकडून प्रस्ताव मिळालेले नाहीत. दोन्ही आरोपींचा कसून शोध सुरू असून त्यांच्या अटकेनंतरच योजनेत अपहार करणार्‍या अन्य आरोपींना अटक करता येणार असल्याचे तपास अधिकारी नाईक यांनी सांगितले.

217 कोटींच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच मिळाली स्थगिती !










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !