राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम : गरजूंना ब्लँकेटचे वाटप
भुसावळ : भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, अष्टभूजा डेअरीचे संचालक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नितीन धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्यावर शनिवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मित्र मंडळी, चाहते, कार्यकर्ते तसेच सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेवून तसेच दूरध्वनीद्वारे व सोशल मिडीयाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी धांडे यांनी शहरातील विविध भागातील गरजूंना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचे वाटप केले.




