विविध स्पर्धेतील गुणवंतांचा भुसावळ शहरात गौरव
परशुराम जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : मेहनत घेणार्यांचाही गौरव
भुसावळ : परशुराम जयंती उत्सव समिती 2022 च्या वतीने यंदा परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले. या निमित्त जन्मोत्सवाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेणार्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बडा हनुमान मंदिरात गौरव करण्यात आला तसेच उत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून विविध चित्र, गीते भजन, सादर करून यश मिळवणार्या गुणवंतांचाही गौश्रव करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
लहान बालक रुद्र शर्मा, अश्विनी शर्मा, विवेक उपाध्याय यांचा सम्मान चिन्ह, रोख रक्कम, आयुर्वेदिक औषधी वाटप करून गौरव करण्यात आला. कैलास उपाध्याय, प्रशांत वैष्णव, जयप्रकाश शुक्ला, समिती अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा), दीपक पाथरकर, आशिष तिवारी, देवेश कुलकर्णी, भूषण वैद्य, आनंद जोशी, सागर पतकी, अनिरुद्ध कुलकर्णी, आशुतोष दलाल, प्रशांत उपासनी, केर्हाळकर गुरुजी, संकेत कुलकर्णी, संदेश शुक्ला, गणेश जी वडवेकर, शंतनु गजके, खुशाल जोशी, आदित्य शर्मा आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







