भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील तरुणाची आत्महत्या
भुसावळ : शहरातील अयोध्या नगर भागातील 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 23 रोजी ही घटना उघडकीस आली. अतुल विठ्ठल खंबायत (28, अयोध्या नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.
शहर पोलिसात नोंद
या प्रकरणी माजी नगरसेवक दीपक काशीनाथ धांडे (अयोध्या नगर, भुसावळ) यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. तपास निरीक्षक गजानन पडघाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विकास बाविस्कर करीत आहेत.

दोघांचे प्रेम जडले अन त्यांनी जोडीदारांनाच सोडले







