!-- afp header code starts here -->

फैजपूरच्या मुन्ना चौधरींच्या कला कृतींची इंडिया बुक रेकॉर्डकडून दखल

सुवर्णपदकाने केला सन्मान ः श्री सतपंथ देवस्थानातही महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी केले स्वागत


फैजपूर : शहरातील रहिवासी तथा दिव्यांग सेना यावल तालुकाध्यक्ष योगेश गणेश चौधरी उर्फ मुन्ना भाऊ यांच्या बाटलीतील विविध कलाकृतीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 साठी विशेष दखल घेत त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले आहे. निमित्त मुन्ना चौधरी यांचा हृदय सत्कार मंगळवार, 24 मे 2022 रोजी श्री सतपंथ देवस्थानात करण्यात आले. राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ पिंपरुड व दिव्यांग सेना, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज होते.

तर ध्येह सहज होईल साध्य : महामंडलेश्वर
महामंडलेश्वर जनार्दन स्वामी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मनातील दिव्यांगावर मात केल्यास आपले ध्येय सहज साध्य करता येईल. दिव्यांग तरुण मुन्ना चौधरी यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करीत आपल्या ध्येयपूर्तीसाठी सतत कार्यरत राहून हे यशोशिखर गाठले आहे, त्यांच्या या कलाकुसरीची इंडिया बुक रेकॉर्ड ने घेतलेली दखल फैजपूर शहरवासीयांसाठी एक आनंदाचा पर्व आहे. मुन्ना यांनी अथक परीश्रमातून हे यशोशिखर गाठले आहे याचा आदर्श अन्य दिव्यांग बांधवांनी तर घ्यावाच मात्र मनाने दिव्यांग असलेल्या तरुणांनी घ्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

आई-वडिलांसह मित्रांचाही वाटा : मुन्ना चौधरी
मुन्ना चौधरी यांनी आपल्या सत्कारार्थी मनोगतात सांगितले की, आपल्या जीवनातील स्व.प्रेरणा-पराकाष्टाची साधना करून सतत कार्यमग्न राहून चांगल्या ध्येयपूर्तीकडे मार्गक्रमण केल्यास यशोशिखर सहज गाठता येते मात्र त्यासाठी जीवाभावाचे मित्र परीवार यांच्याशी स्नेह अधिक दृढ जपणे महत्त्वाचे आहे. आजचे हे यश मित्र राहुल कोल्हे, विशाल दांडगे, पराग वारके, संजय सराफ, नितीन महाजन, ललित वाघूळदे, अशोक कोळी, चेतन तळेले, दुर्गेश कोंगे, चिराग पाटील, गणेश भारंबे, संजय वानखेडे, अंकुर भारंबे, कृणाल वाघूळदे, रोहित भारंबे, रोहित तायडे, भिकन वसाने, मनोज होले, विनोद वर्‍हाडे तसेच दिव्यांग सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज व आई-वडिलांचे आशीर्वादामुळे मिळाले असल्याचे मत नोंदवले.

सहृदयाने केले स्वागत
याप्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून प्राप्त झालेले सुवर्णपदक, बॅच, ओळख पत्र, सन्मानपत्र, पेन आदी वस्तू महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज यांच्या शुभहस्ते मुन्ना यांना प्रदान करण्यात आल्या तसेच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन महाराजांनी त्यांचा विशेष सत्कार केला. राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ पिंपरुडतर्फे राहुल कोल्हे, विशाल दांडगे, पराग वारके, फैजपूरातील पत्रकारांतर्फे उमाकांत पाटील व संजय सराफ, कला अविष्कार ग्रुपतर्फे व्ही.ओ.चौधरी, पार्थ चौधरी, दिव्यांग सेना फैजपूरतर्फे शहराध्यक्ष नितीन महाजन यासह उपस्थित दिव्यांग सेना रावेर-यावल तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी पत्रकार प्रा.उमाकांत पाटील, दिव्यांग शहराध्यक्ष नितीन महाजन यांना राहुल कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संजय सराफ तर आभार विशाल दांडगे यांनी मानले. याप्रसंगी राहुल कोल्हे मित्र मंडळ व दिव्यांग सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसावळात आयशर कंटेनरवर धडकली : चालक जखमी 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !