डॉक्टरांनी शिक्षिकेवर केला अत्याचार : गर्भपाताचाही आरोप
दिल्ली : मुलांना शिकवणार्या अल्पवयीन शिक्षिकेवर डॉक्टरने बलात्कार केला तसेच अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून तो बराच काळ तिचे लैंगिक शोषण केले व पिडीतेचा गर्भपात केला. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे ही घटना घडली.

डॉक्टरांवर अत्याचाराचा आरोप
लखनऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरमध्ये मुलांना शिकवणी देणार्या अल्पवयीन शिक्षकाशी डॉक्टरने गैरवर्तन केले. डॉक्टरच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतरच पीडितेने आरोपी डॉ. आशिष कुमार सिंह उर्फ शेखरविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
नशेच्या गोळ्या देत केला अत्याचार
शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे की, ती डॉ. शेखर यांच्या मुलाला शिकवायला घरी जात असे. एके दिवशी डॉ शेखर हे एकटेच घरी होते. शेखरने तिला बसवले आणि चहा दिला. मात्र डॉ.शेखरने चहामध्ये नशेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. या दरम्यान शेखरने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शेखर तिला ब्लॅकमेल करु लागला तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याचदरम्यान, शिक्षिका शेखरपासून गर्भवती राहिली. त्यामुळे शेखरने तातडीने तिला औषधे दिली आणि तिचा गर्भपात केला. त्याची कृत्ये सातत्याने वाढू लागल्यावर पीडितेने हा प्रकार घरच्यांना सांगितला.
अश्लील फोटो काढत धमकावले
पीडितेने सांगितले की, डॉ. शेखरने सॉफ्टवेअरद्वारे एडिट करून तिचा अश्लील फोटो काढला होता. त्यानंतर त्याने तिला तो दाखविला. तसेच, सातत्याने धमकावले आणि गैरवर्तन करत व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बराच काळ शोषण केले. दरम्यान, पोलिस निरीक्षक रामेश्वर कुमार यांनी सांगितले की, आरोपी बीएएमएस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.







