!-- afp header code starts here -->

Bus Carrying 26 Army Personnel Falls Into Shyok River 7 Died  लष्करी वाहन 60 फूट खोल नदीत कोसळले : 7 जवान ठार


Bus Carrying 26 Army Personnel Falls Into Shyok River 7 Died नवी दिल्ली : लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लदाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये लष्कराचे वाहन 60 फूट खोल श्योक नदीत कोसळल्याची बाब उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत 19 जवान जखमी झाले.

सात जवानांचा जागीच मृत्यू
भारतीय लष्करानुसार, 26 सैनिकांची तुकडी परतापूरहून लेह जिल्ह्याच्या हनीफ सब सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टकडे जात होती. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता थोइसेपासून 25 किमी दूर घडली. लष्कराचे वाहन अनियंत्रित होऊन श्योक नदीत कोसळले. सर्व जखमी जवानांना चंडीमंदिर कमांड रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी 7 सैनिकांचा मृत्यू झाला. लेह येथून परतापूरसाठी लष्कराच्या सर्जिकल टीम रवाना केल्या आहेत,असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !