भुसावळात एकास मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
भुसावळ : किरकोळ कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील दादासाहेब रूपवते हौसिंग सोसायटीतील रहिवासी आनंदा भीमराव चौथमल यांना नागेश आराक याने माझ्या वडीलांना का मारले? असे म्हणत टोकदार वस्तूने चौधमल यांच्या डाव्या डोळ्याचे बाजूला मारून दुखापत केली तर संशयीत नागेशची बहिण व आई यांनी चौथमल यांच्या पत्नीला मारहाण करीत शिविगाळ केली. चौथमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात दोन महिलांसह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुपडा पाटील पुढील तपास करीत आहे.







