चिनावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर
आवाजी मतदानाने ग्रामस्थांनी दिली ठरावाला मंजुरी : महिला सरपंचाचे ग्रामस्थांना पाणी बचतीचे आवाहन
सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे मंगळवार, 31 रोजी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत गावात संपूर्ण दारू बंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
रायपूरच्या तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
आवाजी मतदानाने दारूबंदीच्या ठरावावर एकमत
ग्रामसभेत अजेंड्यावर असलेल्या विषयांचे वाचन येथील ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी केले. अजेंड्यावर असलेल्या विषयावर चर्चा होवून करून विषय मंजूर करण्यात आले तर विजयकुमार जैस्वाल यांच्या देशी दारू दुकान स्थलांतराबाबत आलेल्या अर्जाबाबत चर्चेवर अर्जदारच सभेला हजर नसल्याने हा विषय नामंजूर करण्यात आला. काही ग्रामस्थांनी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी केल्याने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यावा, असे आवाजी बहुमताने ठरले. ग्रामस्थांनी यावेळी विविध समस्या मांडल्या.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले यांनी सभेत मार्गदर्शन करताना ग्रामस्थांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. स्वच्छता व आरोग्य चांगले राहण्यासाठी महिला-पुरुषांनी आपला परीसर, गटारी स्वच्छ ठेवा, नळाला तोट्या लावा व ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जि.प.सदस्या सुरेखा पाटील, उपसरपंच परेश महाजन, सागर भारंबे, संदीप टोके, शशीकांत भालेराव, कविता किरगे, धनश्री नेमाडे, मनिषा पाटील, ज्योती भालेराव हे सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले, श्रीकांत सरोदे, बन्सी गारसे, किरण नेमाडे, डॉ.सुभाष ठाकूर, रोहिदास बार्हे, अनिल किरगे यांनी सभेत भाग घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
शासन स्तरावर पाठपुरावा करणार
गावात दारु बंदीचा ठराव करण्याची मागणी सभेत झाल्याने याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी दिली.
जळगाव शहरात धाडसी घरफोडी : सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला







