विमा एजंटाआड अवैध सावकारी : धुळ्यातील एजंट पावणेदोन कोटींच्या मुद्देमालासह जाळ्यात


धुळे : विमा एजंट असतानाही अवैध सावकारीच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवणार्‍या धुळ्यातील विमा एजंट राजेंद्र बंबसह त्याच्या भावाच्या घरावर पाच पथकांनी एकाचवेळी छापा टाकला. संशयीताच्या घरातून तब्बल सव्वा कोटींची रोकड, 46 लाखांचे 998 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अनेक आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राजेंद्र जीवनलाल बंब (49, रा.ग.नं.7, जुने धुळे) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्याच्याविरेोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्यंत गोपनीय पद्धत्तीने कारवाई
पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छा, पोलीस उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय गुप्तता बाळगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, हिरालाल ठाकरे, पोलीस हवालदार गयासुद्दीन शेख, भुषण जगताप, रविंद्र शिंपी, मनोज बावीस्कर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी दादासाहेब पाटील, उमेश बोरसे, मनोज ठाकरे, अनिल महाजन, सुवर्णा महाजन आणि पोलिस अंमलदारांचे तसेच सावकारांचे सहायक निबंधक तथा उप-निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचे मंगळवारी स्वतंत्र 5 छापा पथके तयार करण्यात आली. याच पथकांनी एकाच वेळी छापा कारवाई केली. मुख्य आरोपी राजेंद बंब याच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला. काल दिवसभर व रात्रीउशिरापर्यंत चौकशी करण्यात आली.

हा मुद्देमाल केला जप्त
चौकशीत गुन्हयाशी संबंधीत आक्षेपार्ह दस्तऐवज, सौदा पावती, गहाण खत, रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आले. त्यात पंचनामा कारवाईकरुन मुख्य आरोपी राजेंद्र बंब याच्या घरातून एक कोटी 30 लाख एक हजार 150 रुपये रोख व 46 लाख 22 हजार 378 रुपयांचे 998.470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन तसेच आरोपीचा भाऊ संजय बंब याच्या घरातून गुन्हयाशी संबंधीत कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन
दरम्यान राजेंद्र बंब याने कोणा कर्जदाराच्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण अगर सौदा पावती करुन ठेवून घेतले असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या देखील वाढणार आहे.

भुसावळात एकास मारहाण : तिघांविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !