बनावट दारू बनवणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट दारू तयार करणार्या टोळीच्या मुसक्या आवळत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. धुळे तालुक्यातील चिंचवार भावाच्या शिवारात असलेल्या वनजमिनीत किरण सुधारक देशमुख हा व त्याच्या साथीदारांसह अवैधरित्या दारु बनविण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
व्यवसाय करण्याच्या आमिषाने तीन लाखांत ऑनलाईन फसवणूक
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
किरण सुधाकर देशमुख, रामसींग बन्सीलाल ठाकरे, हारीष हारुल पटेल, शेतमालक रफीक मेहमुद पटेल यांना बनावट दारू तयार करीत असताना रंगेहात पकडुन त्यांचा ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीची टाटा सुमो वाहन क्र. (चक 19-द0620), 74880 रुपये किंमतीचे टॅगो पंच देशी दारुचे 26 बॉक्स, 1,12,320 रुपये किंमतीचे रॉयल स्पेशल विस्कीचे 52 बॉक्स, 3480 रुपये किंमतीचे टॅगो पंच देशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे 40 बॉक्स, 50,050 रुपये किंमतीचे बुध पॅकींग व दारु मिक्सींग करीता उपयोगात पडणारे तीन मशीन, 650 रुपये किंमतीचे दारुच्या बाटल्यांचे बुच, 15500 रुपये किंमतीचे चार मोबाईल फोन, 6380 रुपये किंमतीचे दारु बनविण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण चार लाख 63 हजार 260 रुपये किंमतीचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हरा
स्थानिक गुन्हे शाखेचे सागर सुभाष शिर्के यांचे फिर्यादीवरून सोनगीर पोलीस स्टेशन येथे आरोपी किरण देशमुख, रामसींग ठाकरे, हारीष पटेल, शेतमालक रफीक पटेल, संजय पटेल, गुलाब शिंदे, पाटील (पुर्ण नाव माहीत नाही), दिनेश (पुर्ण नाव गाव माहीत नाही) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रकाश पाटील, योगेश राऊत, धनजंय मोरे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.
नटवाडेतील विवाहितेचा अनैतिक संबंधातून पतीनेच केला खून







