मारहाण प्रकरण : शिरसाळ्यातील पाच जणांविरुद्ध गुन्हा


बोदवड : तालुक्यातील शिरसाळा येथे 9 रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान बसस्थानकावर सुरेश नारायण कोळी आपल्या मित्रांसोबत उभे असताना गावातील राजेंद्र गोविंद पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर राजेंद्र देविदास तायडे यांना काहीएक कारण नसताना राजेंद्र गोविंदा पाटील, जितेंद्र रामदास पाटील, रघुनाथ पांडुरंग पाटील, गणेश विश्वनाथ पाटील, अमोल एकनाथ पाटील या पाच जणांनी लाकडी दांडा लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती तर या घटनेत मजुरीचे एक हजार 200 रुपये गहाळ झाले होते. मारहाणीत राजेंद्र देविदास तायडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू होते. मारहाण प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !