भुसावळातील श्री गंगा नगरात उद्यान उभारणी कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील श्री गंगा नगर या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या जागेवर मंगळवार, 14 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते एक एकरावर जागेवर उद्यान उभारणी कामाचा शुभारंभ करण्यात आला. भुसावळातील प्रथितयश बिल्डर शर्मा इस्टेट डेव्हलपरतर्फे या साईड विकसीत करण्यात आली असून आजघडीला 50 कुटुंब वास्तव्यास आली आहेत.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
उद्यान उभारणी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, श्री गंगा नगरातील नागरीक आणि प्रकल्पाचे विकासक प्रेमकुमार शर्मा वअनुराग शर्मा यांच्यासह शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक एकरावर उभे राहणार प्रशस्त उद्यान
श्री गंगा नगरातील एक एकर खुल्या जागेवर विकासकाकडून उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात जॉगिंग ट्रेक, अॅप्पीथिएटर, ग्रीन जिमची उभारणी केली जाणार आहे शिवाय ओपन स्पेसवर वापरल्या जाणार्या विजेयासाठी सोलर सिस्टीमचा वापर करण्यात आल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
24 तास पाण्यासह विविधांगी सुविधा
श्री गंगा नगरात टू बीएचके, थ्री बीएचके डुप्लेक्स बंग्लो स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 24 तास पाण्याची सुविधा, डांबरी रस्ते, सीसीटीव्ही, शिव मंदिर, प्ले गार्डन, शॉपींग कॉम्प्लेक्स, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज सिस्टिम आदी सुविधा विकासकातर्फे पुरवण्यात आल्या आहेत. भविष्याच्या गुंतवणुकीसाठी व साईटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 99232-22595 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.