गाळ वाहतूक करणार्‍या वाहनांवर मनमानी कारवाई :  मुक्ताईनगरातील आमदारांचा आंदोलनाचा इशारा


मुक्ताईनगर : नदीपात्र गाळमुक्त करणे शासनाचे धोरण असल्याने तापी पूर्णा नदी पात्र गाळमुक्त करण्यासाठी लघू पाटबंधारे विभाग रीतसर परवानगी देत असतांना रावेर व मुक्ताईनगर महसुली अधिकार्‍यांतर्फे गाळ वाहतूक करणार्‍या वाहनांवर मनमानी कारवाया सुरू असल्याने शेतकरी व कुंभार समाजातील लोकांना अन्यायकारक दंडाचा भुर्दंड देण्यात येत आहे. हा प्रकार निषेधार्थ असून तत्काळ सदरील कारवाया थांबविण्यात याव्यात अन्यथा येत्या शुक्रवार, 17 जून रोजी सकाळी 11 जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना पत्राद्वारे दिला आहे.

अन्यायकारक कारवाईचा निषेध
सद्यस्थितीत शेतकरी राजा पेरणी पूर्व मशागतीसाठी जीवापाड मेहनत घेत आहे तसेच नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने या काळात नदीपात्रातील गाळाचा उपसा केला जातो शिवाय शासनाचे धोरण असल्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येते जेणेकरून जास्तीत-जास्त गाळ उपसा झाल्यास नदीपात्र किंवा तलाव, बंधारे असतील यात खोलीकरण झाल्याने भूजल पातली वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकरी बांधव जमिनीची पोत सुधारण्यासाठी तसेच कुंभार समाजातील अनेक कुटुंब जे उदर निर्वाहासाठी विटा बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करीत असतात त्या कुंभार समाजाकडूनही गाळ काढण्यात येतो.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !