कुर्‍हेपानाचे गावातील युवतीची आत्महत्या : संशयितास जामीन


भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील युवती रामेश्वरी नागपूरे हिने 25 मार्चला राहत्या घरात आत्महत्या केली होती. भावी पतीने वारंवार जाड म्हणून हिणवल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी करीत भावी पती व संशयीत भूषण ज्ञानेश्वर पाटील विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता. संशयीत आरोपीने भुसावळ न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो शनिवारी मंजूर केला. पाटील यांच्यातर्फे भुसावळातील अ‍ॅड.ज्योती गौरव बंब यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !