राजकीय उलथापालथ : मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदी लागू
Political upheaval: Curfew imposed in Mumbai till July 10 मुंबई : ठाकरे सरकार सेनेतील बंडानंतर अस्थिर झाल्यानंतर राज्यातील राजकीय परीस्थिती तणावाची बनलेली पाहता मुंबई पोलिसांनी शनिवारी पत्रक काढून 10 जुलैपर्यंत मुंबईत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत आता पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास परवानगी नसणार आहे.
पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व अप्पर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्त यांची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार व महत्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


राजकीय परीस्थितीवर पोलिसांचे बारीक लक्ष
कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सूचना पोलिसांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात कलम 144 सीआरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश पाळले जातील याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी अखेर अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात