हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस नसल्याने आवक घटली
भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस नसल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणाचे केवळ दोन दरवाजे 0.25 मिटरने उघडून विसर्ग केला जात आहे. पूर्णा नदीच्या खोेर्यात शुक्रवार, 17 जून रोजी झालेल्या पावसानंतर आवक वाढली होती. यावेळी चार दरवाजे 24 तास उघडण्यात आले होते. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने आवक घटली आहे.
बंडखोर मंत्र्यांचे अखेर खाते काढले
दमदार पावसानंतर वाढणार आवक
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्या पूर्णा नदीच्या खोर्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे 17 जून रोजी धरणाचे चार दरवाजे उघड्यात आले होते मात्र दुसर्याच दिवशी ते बंद झाले. यानंतर थोड्याफार प्रमाणात आवक असल्याने विसर्ग सुरु होता. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पूर्णा नदीच्या खोर्यात येणार्या लोहारा, ऐरणी, गोपाळखेडा, चिखलदरा, लखपूरी, अकोला तर तापी नदीच्या खोर्यातील टेक्सा, देडतलाई, बर्हाणपूर आदी पर्जन्यमापक स्थानकांवर पावसाची नोंद झाली नाही. यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणातील पाण्याची आवक घटली आहे. हतनूर धरणाचे केवळ दोन दरवाजे 0.25 मिटरने उघडून नदीपात्रात 24 क्युमेक्स वेगाने विसर्ग होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसानंतर आवक वाढणार आहे.


209 मिटर पातळी स्थिर
हतनूर धरणात विसर्गानंतर सध्या 180 दलघमी जलसाठा कायम आहे. तर 209. 500 मिटरची जलपातळी आहे. धरणातून उजव्या तट कालव्यातूनही विसर्ग केला जात आहे. तापीमाई दुथळी भरुन वाहण्यासाठी धरणातील पाण्याची आवक वाढणे अपेक्षीत आहे. येत्या आठवड्यात पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास आवक वाढेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.