बेरोजगारांना रोजगारासाठी दीपनगर प्रकल्पावर मोर्चा


पायी मोर्चाचे फलित : प्रकल्प संचालक व्ही.थंगी पंडीयान यांनी न्याय देण्याचे दिले आश्‍वासन

भुसावळ : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या मागणीसाठी वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव ते दीपनगर औष्णिक केंद्रापर्यंत शुक्रवारी दुपारी पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक व्ही.थंगी.पंडीयान यांनी मोर्चेकर्‍यांना सर्वांना समान न्याय मिळेल, असे आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मोर्चेकर्‍यांच्या घोषणाबाजीने परीसर दणाणला.

सहा किलोमीटर पायी चालत आले मोर्चेकरी
वरणगाव शहरातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी नगराध्य सुनील काळे यांचे विविध प्रयत्न सुरू आहे. गेल्या महिन्यापासून औष्णिक विद्युत केंद्रात नवीन प्रकल्पात रोजंदारीवर कामगार घेण्याबाबत सुनील काळे यांचा लढा सुरू आहे. प्रकल्पातील अधिकारी अनंत देवतारे कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन देत आहे मात्र कामावर घेत नसल्यामुळे शुक्रवारी वरणगाव ते दीपनगर औष्णिक केंद्रापर्यंत बेरोजगारी तरुणांनी सहा किलोमीटर पायपीट करीत मोर्चा काढला. औष्णिक केंद्राच्या प्रवेशव्दाराजवळ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशानाला जागे करून तरुणाच्या हाताला काम देता का ? वा ठिया आंदोलन करू अशा घोषना देत प्रशासकीय अधिकार्‍यांना प्रवेश द्वाराजवळ बोलवून आमचे म्हणे ऐकून घ्यावे तरुणांना रोजगार द्या, असा टाहो फोडताच अधिकारी आले त्यांनी तरुणाच्या भावना ऐकून कामावर घेण्याचे आश्वासन दिले. प्रसंगी अभियंता किसन मारूळकर, विवेक रोकडे, नितीन पुणेकर, जावळे, पंकज सनेर, प्रितम देशकर, मुंडे आदी अधिकारी उपस्थित होते.




मोर्चात यांचा सहभाग
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, इरफान पिंजारी, राजेंद्र गुरचळ, ज्ञानेश्वर घाटोळे, सुनील माळी, अजय पाटील, शामराव धनगर आदींसह बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सुरक्षा अधिकारी एम.एस.पाटील यांच्यासह 69 सुरक्षा कर्मचार्‍यांसह पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !