जळगावातील व्यावसायीकाला अनोळखी लिंकमुळे बसला लाखाचा आर्थिक फटका
An unidentified link to a businessman in Jalgaon caused a financial loss of Rs One Lakh जळगाव :अनोळखी लिंकवरील क्लिक करणे जळगावातील व्यावसायीकाला महाग पडले आहे. मोबाईलवर अनोळखी क्रमांकावर आलेल्या लिंकवर क्लिक करताच व्यावसायीकाची एक लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील द्रौपदी नगरात निर्मलकुमार लखमीचंद चांदीवाल (60) हे वास्तव्यास आहेत. रविवार, 26 जून रोजी घरी असतांना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमाकांवरुन एक लिंक आली. या लिंकवर क्लिक केले असता, अनोळखी व्यक्तीने चांदीवाल यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. फसवणुकीची खात्री झाल्यावर निर्मलकुमार चांदीवाल यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

