Nasirabad Accident नशिराबादजवळील भीषण अपघात ट्रकचा टायर फुटल्याने : मयत जळगाव जिल्ह्यातील रहिवासी
Terrible Accident Near Nasirabad Due to Flat tire of a Truck: Mayat Residents of Jalgaon District भुसावळ : भरधाव ट्रकचा टायर फुटल्यानंतर वाहन अनियंत्रीत होवून ते दोन पिकअप वाहनांना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर 13 जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण अपघात नशिराबाद टोलनाक्याजवळ बुधवारी पहाटे सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बराच ठप्प झाली होती. नशिराबाद पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रीत केली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांचा मयतांमध्ये समावेश
समजलेल्या माहितीनुसार, या अपघातात अकिल शेख गुलाब खाटीक (40, ईस्लामपूरा, फैजपूर), नईम अब्दुल रहिम खाटीक (62, तांबापुरा, जळगाव), शेख फारूक शेख मजीद (42, हकीम नगर, भडगाव तालुका), जुनेद सलीम खाटीक (18, भडगाव) यांचा समावेश आहे तर अन्य 12 जण अपघातात जखमी झाले आहेत. अपघातातील मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींवर गोदावरी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून या अपघातात ट्रक चालकही जखमी झाला आहे.


तिहेरी अपघात चौघे ठार
बुधवारी फैजपूर येथील बाजार असल्याने जळगाव व नशिराबाद येथून बकर्या घेवून विक्रेते बोलेरो पीकअप वाहन (क्रमांक एम.एच.43 ए.डी. 1051) भुसावळच्या दिशेने येत असताना समोरून येणार्या भरधाव ट्रक (क्रमांक एम.एच.09 एच.जी.9521) ने धडक दिल्यानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला तर त्याचवेळी भुसावळच्या दिशेने येणार्या पिकअप (एम.एच.43 बी.बी.0050) ला ट्रकची जबर धडक बसल्याने दोन्ही वाहने चक्काचूर झाली तर वाहनातून बकर्या विक्रीसाठी येणार्यांपैकी चौघे जागीच ठार झाले तर अन्य 12 जण जखमी झाले. जखमींवर तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भुसावळात जनरल तिकीट सुविधा सुरू होताच पहिल्याच दिवशी रेल्वे मालामाल
अपघातात ट्रक चालकासह 13 जखमी
या भीषण अपघातात ट्रक चालक वसंत रामहरी देऊलकर (55, रा.अकोला), रसुल कुरेशी (भडगाव), प्रकाश पंढरीनाथ शिंदे (43, पळासखेडा मिराचे), संतोष दौलत धनगर (60, नेरी, ता.जामनेर), सलीम गुलाम खाटीक (50, नशिराबाद), मुस्ताक हाजी बिस्मिल्ला (47, लोहारा, ता.पाचोरा), अब्दुल रज्जाक खाटीक (46, नशिराबाद), हनीफ खाटीक (40), लियाकत बापू खाटीक (48), शेख सलीम शेख महेबूब (46, भडगाव), शाकीर खाटीक, ईरफान खाटीक व जुबेर खाटीक (तिघे रा.भडगाव) हे 13 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातप्रकरणी पिकअप चालक रसुल खान रशीद खान कुरेशी (जयहिंद कॉलनी, भडगाव) यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक ट्रक चालक वसंत रामहरी देऊलकर (55, रा.अकोला) विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातानंतर पोलिस प्रशासनाची धाव
अपघाताची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक किरण मोरे, उपनिरीक्षक राजू साळुंखे, महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, हितेश पाटील, दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोदावरी रुग्णालयात हलविले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.