ट्रॅक्टर घेण्यासाठी दिड लाख न आणल्याने टोळीतील विवाहितेचा छळ
पारोळा : तालुक्यातील टोळी येथील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेने ट्रॅक्टर घेण्यासाठी दीड लाख रुपये न आणल्याने मारहाण करीत छळ करण्यात आला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नशिराबादजवळील भीषण अपघात ट्रकचा टायर फुटल्याने ? : मयत जळगाव जिल्ह्यातील रहिवासी
चौघांविरोधात गुन्हा दाखल
पारोळा तालुक्यातील टोळी येथील बाहेर असलेल्या पुष्पा गणेश पगार (25) यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील आमोदे येथील गणेश आधार पगार यांच्यासोबत रितीरिवाजानुसार 2017 मध्ये झाला. लग्नाच्यानंतर किरकोळ कारणावरून विवाहितेला टोमणे मारण्यात आले तर पतीने ट्रॅक्टर घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून पती गणेश याने दारूच्या नशेत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर तू जर ट्रॅक्टरसाठी माहेरहून पैसे आले नाही तर तुला नांदविणार नाही, असा दमदेखील दिला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेच्या फिर्यादीवरून पती गणेश हजार पगार, सासरे आधार शंकर पगार, सासू रत्नाबाई आधार पगार, दिनेश आधार पगार (सर्व रा.आमोदे, ता.नांदगाव, जि.नाशिक) यांच्या विरोधात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.

