अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी
मुंबई : अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधी मंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असलेतरी त्यांचे सदस्यत्व मात्र कायम राहणार आहे. कारण नियमानुसार त्यांनी स्वत: पक्ष सोडला असता तर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं असतं. जोपर्यंत ते विधीमंडळ गटनेतेपदी आहेत तोवर अजित पवारांना व्हिप जारी करण्याचे अधिकार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घटनेच्या दहाव्या अनुच्छेदानुसार बैठक बोलावून अजित पवार यांच्या विरोधात ठराव द्यावा लागणार आहे.