धाक संपला : चोपड्यात चोरट्यांनी दोन घरे फोडत पाच लाखांचा ऐवज लांबवला
Chopda Gharphodi चोपडा : भर दिवसा दोन घरे फोडत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना शहरातील त्र्यंबकराव नगर प्लॉट तसेच सहकार कॉलनी भागात घडली. दोन्ही ठिकाणाहून चार लाख 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. त्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. चोपडा शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार
चोपडा शहर पोलिसात गुन्हा
त्र्यंबकराव नगर प्लॉट भागातील संतोष शिवदास सोनवणे यांच्या राहत्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी गुरुवार, 30 जून रोजी भर दुपारी प्रवेश करीत घराच्या बेडरुममधील लाकडी कपाटाचे ड्रावर आणि लॉकर तोडून 80 हजार रुपये रोख, दिड लाख रुपये किंमतीची 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. चोपडा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिस उप निरीक्षक घनशाम तांबे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

सहकार कॉलनीतही घरफोडी
दुसर्या घटनेत सहकार कॉलनी भागात राहणारे कैलास रामदास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप देखील चोरट्यांनी 30 जूनच्या भर दुपारी तोडून प्रवेश करीत 85 हजार रुपये रोख, 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व एक ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या मिळून दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण तपास करीत आहेत.