तरुणाला मारहाण करीत लांबवला मोबाईल
Mobile beaten up by youth जळगाव : शहरातील रींगरोडवरून पायी जाणार्या तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करून त्याच्या हातातील 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला असून या प्रकरणी 30 जुन रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकलीविरोधात गुन्हा
विजय ज्ञानेश्वर राठोड (22, धोबीवराड, ता.जि.जळगाव) हा तरुण शहरातील राजेश हॉस्पिटल येथे वास्तव्याला आहे. या ठिकाणी ओटी टेक्निशियन म्हणून कामाला आहे. बुधवार, 29 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजय राठोड हा रिंगरोड वरील बडोदा बँकेच्या एटीएम जवळून पायी जात असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर घेऊन त्यांनी विजयचा रस्ता अडविला व तोंडाला रुमाल बांधून त्याला मारहाण केली. त्याच्या हातातील 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व एटीएम कार्ड घेऊन पसार झाले. याबाबत विजयने तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.
