भुसावळात डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर
भुसावळ : डॉक्टर्स डे निमित्त शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, आयएमए, भुसावळ आणि धन्वंतरी ब्लड बँक यांच्यातर्फे रक्तदान आयोजित शिबिरात 25 दात्यांनी रक्तदान केले. आयएमए हॉलमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन डॉ.सुरेंद्र भिरूड यांच्याहस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, आयएमए, भुसावळ आणि धन्वंतरी ब्लड बँकेचे सदस्य मोठ्या संख्येने उस्थित होते. रक्तपेढीचे संचालक डॉ.प्रवीण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर झाले.
यांची होती उपस्थिती
रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, प्रकल्प प्रमुख डॉ.नितीन दावलभक्त, आयएमए अध्यक्षा डॉ.अर्चना खानापूरकर, सचिव डॉ.चित्तरंजन चौधरी, डॉ.प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
