Bhusawal Tapi Pull Sucide भुसावळातील एकाची तापी पात्रात आत्महत्या


Sucide in Tapi Character Of Bhusawal भुसावळ : शहरातील रहिवासी असलेल्या एकाने तापी पात्रात उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. निलेश विजय डहाळे (41, विवेकानंद कॉलनी, भुसावळ)असे मयताचे नाव आहे. भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तापी पुलावर सायकल लावून केली आत्महत्या
शहरातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारून निलेश विजय डहाळे (41, विवेकानंद कॉलनी, भुसावळ) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. डहाळे हे एका मेडीकल दुकानात कामास होते व शनिवारी कामावर जाण्यासाठी ते घरून डबा घेवून निघाले मात्र त्यांनी अचानक तापी पुलावरून उडी घेतली व खडकावर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. डहाळे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. सहायक फौजदार संजय कंखरे, विशाल साळुंखे पुढील तपास करीत आहे.


वाढत्या गुन्हेगारीला थोपवण्यासह सर्वसामान्यांना न्याय देणार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !