A 17-Year-Old Girl Is Pregnant after being Abused by Her Father नराधम पित्याच्या अत्याचारातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती
A 17-Year-Old Girl Is Pregnant after being Abused by Her Father जळगाव : नराधम बापाने पोटच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उजेडात आहे. याबाबत नराधम बापाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघा हरणांचा मृत्यू
पित्याने केला अत्याचार
औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सावत्र आई, वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. सहा महिन्यांपूर्वी पीडीत मुलीची सावत्र आई ही गर्भवती असल्याने ती तिच्या माहेरी गेली तर पीडीत मुलीचे आजी व आजोबा हे नगर येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी गावाला गेले. त्यावेळी घरी ीडीत मुलगी, तिचा लहान भाऊ आणि तिचे वडील हे तिघे घरीच होते. एके दिवशी रात्री तिघांनी जेवण केल्यानंतर पीडीता झोपली असतांना पित्याने पीडीतेचे तोंड दाबून अत्याचार केला. हा प्रकार त्याने तीन ते चार वेळा केला. दरम्यान, पीडीत मुलीची आजी घरी आल्यानंतर तिच्या कानावर पीडतेने हा प्रकार सांगितला.त्यावेळी मुलीच्या आजीने नराधम बापावर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला.

अत्याचारानंतर पीडीता गर्भवती
गेल्या महिन्यात पीडीत मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून तिची आजी ही पीडीतेला घेवून पाचोरा येथील खाजगी रूग्णालयात घेवून गेली असता ती गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडीत मुलीला तिच्या आजीने जळगाव गाठले.त्यानंतर हा प्रकार जिल्हापेठ पोलिसांना रविवार, 3 जुलै रोजी कळल्यानंतर त्यांनी धाव घेतली. बालकल्याण समितीचे पत्र आणि पिडीत मुलीच्या जबाबावरून सरकारी फिर्यादी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांच्या फिर्यादीवरून नराधम बापावर सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.