Bhusawal Mukesh Patil भुसावळ शहरातील प्रभाग आठमध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ


Commencement Of Concreting Work in Ward Eight of Bhusawal City भुसावळ : नागरी दलितेतर योजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील तीन रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शनिवारी शुभारंभ झाला. माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला.

तीन कामांचा शुभारंभ
प्रभाग क्रमांक आठमधील गोकुळ लोखंडे यांच्या घरापासून ते रामा गुरुजींचे निवासस्थान व टिल्लू भाई गॅरेज ते उषा कोळी यांच्या घरापर्यंत तसेच संजय फालक यांच्या घरापासून एकनाथ पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण मंजूर असून या कामांचा शनिवारी माजी नगरसेवक मुकेश पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, वसंत पाटील, सतीश सपकाळे, गुणवंत बोरोले, विशाल जंगले, विशाल नारखेडे, कैलास झोपे, पंकज खाचणे, धीरज पाटील, नथू झोपे, कुसुम झोपे उपस्थित होते.


अजित पवार स्पष्टच म्हणाले : फुटलेल्या नेत्यांसोबत कार्यकर्ते जात नाहीत 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !